पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.) बजाज अलियान्झ पुणे मॅरेथॉन 2023 ला पुणेकरांनी आज प्रचंड प्रतिसाद दिला. पहाटे 5 वाजल्यापासूनच बालेवाडी म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उत्साही पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावण्यास सुरूवात केली होती. जसजशी 10 डिसेंबरची पहाट पुढे सरकत होती. तसतेसे 21.1 किमी, 10 किमी, 5 किमी अन् 3 किमीची मॅरेथॉन सुरू झाली.
काही वेळातच विजेते देखील जाहीर झाले. याचबरोबर यंदाच्या मॅरेथॉनमध्ये पुणेकरांनी केलेल्या विविध वेशभूषेने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.बजाज अलियान्झचे कर्मचारी असलेले शेख कुटुंबीय देखील पहिल्यांदाच सहपरिवार पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मात्र ते फक्त सहभागी झाले नाही तर ते त्यांच्यासोबत आपल्या चिमुकल्या झाशीच्या राणाला झुनैराला देखील सोबत घेऊन आले होते.
हिंदुस्थान समाचार
