cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > लहान मुलांसोबत काम करताना माझ्यातील लहान मूल जागे होते – यशश्री मसुरकर
Entertainment

लहान मुलांसोबत काम करताना माझ्यातील लहान मूल जागे होते – यशश्री मसुरकर

CliQ INDIA
Last updated: December 8, 2023 7:30 pm
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.) : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दबंगी – मुलगी आई रे आई मालिकेच्या, एका आर्या (माही भद्रा) नावाच्या छोट्या चुणचुणीत आणि दबंगी तेवर असलेल्या मुलीभोवती फिरणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्याचा असा समज आहे की, तिचे वडील एक सुपरकॉप आहेत, पण तिला हे माहीत नाहीये की, ती सत्या (आमीर दलवी) नावाच्या, कोणत्याही मूल्यांची चाड नसलेल्या गुंडाची मुलगी आहे, जो सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आर्याची आई छाया (सई देवधर) हिच्या मृत्यूनंतर सत्याचा भाऊ अंकुश (मानव गोहिल) आर्याला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्याची पत्नी बेला (यशश्री मसुरकर) पोटच्या पोरीसारखी तिची काळजी घेते. या सगळ्या गोंधळात सत्याची पत्नी कस्तुरी (हिमानी चावला) बेलाचे कान भरते की आर्या ही अंकुशची अनौरस मुलगी असू शकते. हे सांगून ती अंकुश आणि बेला यांच्यात गैरसमजाची ठिणगी पेटवून देण्याचा प्रयत्न करते. बेलाची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री यशश्री मसुरकर या मालिकेविषयी, आपल्या व्यक्तिरेखेविषयी, सेटवरील वातावरणाविषयी आणि इतर कलाकारांशी असलेल्या नात्याविषयी भरभरून बोलली, त्याचा हा अंश-

1. बेला, तुझ्या व्यक्तिरेखेविषयी आम्हाला सांग.

• बेला आदर्शवादी आणि विश्वासार्ह आहे. साधेपणा ही तिची ओळख आहे. ती एक प्रेमळ माता, समर्पित सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि लाघवी पत्नी आहे जी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने आपल्या कुटुंबाशी समरस झाली आहे. आपला पती अंकुश याने घेतलेल्या निर्णयाला तिचा नेहमीच भक्कम पाठिंबा असतो. बेलाच्या व्यक्तिरेखेतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिच्यात एक उपजत मातृत्व प्रवृत्ती आहे आणि मला वाटते की ती वृत्ती मी मालिकेत जिवंत करू शकले आहे.

2. प्रत्यक्ष जीवनात तू माता नसल्याने, ही भूमिका करताना तुझे प्रेरणास्थान कोण होते?

• माझ्या अवती-भोवती असलेल्या सर्व माता याच माझी प्रेरणा आहेत. मला लोकांचे निरीक्षण करायला आवडते. बेलासाठी तयारी करताना मला माझ्या या सवयीचा फायदा झाला. शिवाय ‘गिलमोर गर्ल्स’ मालिकेतून देखील मला प्रेरणा मिळाली, कारण या मालिकेत दाखवलेले आई आणि मुलीचे नाते फारच सुंदर आहे. तुमच्यात मातृत्वाची भावना असतेच आणि मला वाटते, आपण आपल्या आईला आपली काळजी घेताना बघत असतो आणि तिचे गुण आपसूक आत्मसात करत असतो.”

3. लहान मुलांसोबत काम करताना कसे वाटते आहे, जे सेटवर महत्त्वाची भूमिका बजावत असतात?

• फारच मजा येते. मी आजवर लहान मुलांचा सहवास तितकासा अनुभवलेला नाही. या हुशार मुलांसोबत काम करत असताना मला माझ्यातील लहान मूल पुन्हा जाणवते आहे. त्यांची निरागसता आणि प्रेम ही इतके निर्मळ असते की, मालिकेतील दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी काही विशेष प्रयास करावे लागत नाहीत. आम्ही आमची सगळी दृश्ये अगदी सहजपणे करतो. हे सगळे उत्तम अभिनेते आहेत. त्यांच्यातील अभिनयाचे वेड अगदी स्पष्ट दिसते.

4. मानव गोहिलशी तुझे नाते कसे आहे?

• मानव गोहिल म्हणजे जणू सेटवर असलेला माझा मोठा भाऊच आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, मानव खूप आध्यात्मिक वृत्तीचा आहे. त्यामुळे त्याच्याशी माझ्या विचारांची देवाण-घेवाण करायला मजा येते. सेटवर तो खोड्याही काढत असतो. तो आसपास असला की वातावरण प्रसन्न असते.

5. लहान मुलांसोबत काम करताना तुझ्यातील लहान मूल जागे होते का?

• होय, मुलांसोबत काम करताना माझ्यातील लहान मूल जागे होते. मी आधीच हे सांगितले आहे. या मुलांसोबत काम करताना खूप मजा येते. मुले मनाने इतकी निर्मळ असतात! त्यांचे कधीच अंतःस्थ हेतू नसतात. त्यांच्या सहवासामुळे मला माझ्यातील निरागस भावना जिवंत करायला मदत झाली आहे. जेव्हा लहान मुले सेटवर असतात, तेव्हा सेटवरील वातावरण बदलते आणि टवटवीत होते.

6. रेडियोपासून ते टेलिव्हिजनपर्यंतचा तुझा प्रवास कसा होता?

• हा प्रवास टेलिव्हिजनपासून रेडियोपर्यंत होता, असे मी म्हणेन. मी आधी टीव्हीवर कारकीर्द सुरू केली. जेव्हा माझ्याकडे काम नव्हते आणि सारे काही हरपल्याची भावना मला सतावत होती, त्यावेळी रेडियो हा माझ्यासाठी एक प्रयोग होता. त्या अनुभवाबद्दल मला कृतज्ञता वाटते, कारण त्यामुळे मला माझ्यातील आणखी एका प्रतिभेचा शोध लागला.

7. प्रवासाचे साधन म्हणून लोक ऑटोचा उपयोग क्वचितच करतात. तू ऑटोने प्रवास करण्याचे का ठरवलेस?

• ऑटो ही माझ्यासाठी एक प्रेमकहाणीच आहे. कठीण परिस्थितीत कोण्या एकाने टुकटुकमधून मला काठमांडूहून भारतात आणून सोडले. ती कृती इतकी हेलावून सोडणारी होती की मी ऑटो विकत घेण्याचे आणि नियमितपणे ती चालवण्याचे ठरवले. आणि आता ती माझी ओळख बनली आहे. मला ऑटो चालवायला आवडते. पण होय, ती एक अपारंपरिक सवारी आहे.

8. तू मराठी आणि मुख्य प्रवाहाच्या उद्योगात काम करतेस. या दोन्हीमध्ये तुला काय फरक जाणवतो?

• मला वाटते की, मराठी कंटेंट अधिक समृद्ध आहे, कारण मराठीतील अप्रतिम साहित्याचा त्यावर पगडा आहे. पण, स्वाभाविकपणे हिंदी मनोरंजन खूप व्यापक स्तरावर पोहोचले आहे. बॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपट मराठी चित्रपटांवरून बनले आहेत. मला वाटते की, मराठी उद्योगातील कंटेंट हा लक्षणीयरित्या अधिक दमदार आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

पहलगाम हल्ल्यावरील व्हायरल पोस्टवर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा खुलासा | BulletsIn
विवेक सांगळे आणि अंकिता वालावलकर यांची 'कसे विसरू' या गाण्यात नवी जोडी
आई तुळजाभवानीच्या दैवत्वाचा प्रत्यय, चिंतामणी पाषाणाचा अद्भुत महिमा ! | BulletsIn
वेरळच्या कार्तिकोत्सवात पराडकर भाऊ-बहिणीची बहारदार मैफल | BulletsIn
रत्नागिरीत सोमवारपासून ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article हॉटेल ओरिएंट इलाईटचा सलग दुसरा, साऊथ सोलापूर आपटे ग्रुपचा दणदणीत विजय
Next Article सिंधुदुर्ग – अधिकाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी दोघांना दंड
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?