रत्नागिरी, 6 डिसेंबर, (हिं. स.) : येत्या १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत कर्नाटकात टिपटूर येथे होणार्या किशोर, किशोरी राष्ट्रीय स्पर्धेकरिता किशोरी संघात रत्नागिरीच्या रिद्धी चव्हाणची निवड झाली आहे.
पालघर येथे झालेल्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेमधून प्रत्येकी १५-१५ जणांच्या संघाची निवड करण्यात आली. या निवडीसाठी राज्य खो-खो असोसिएशनने चार सदस्यीय निवड समिती नियुक्ती केली होती. निवडण्यात आलेले महाराष्ट्राचे संघ राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. त्यानुसार रिद्धीची निवड जाहीर झाली आहे. रिद्धी चव्हाणला राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. किशोर गटाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी लांजा येथील आकाश सोळंखे यांची निवड झाली आहे.
हिंदुस्थान समाचार
