चंद्रपूर 6 डिसेंबर (हिं.स.) : चंद्रपूरच्या लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ब्रिटिश सरकारच्या गोल्डमॅन ॲड. दिपक चटप यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या दुर्गम तालुक्यातून माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून विधी विषयातील उच्च शिक्षण प्राप्त केलेला ॲड. दिपक चटप विविध सामाजिक संघटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना chevening scholar पुरस्काराने सन्मानित केले. अशा ह्या ध्येयवेढे तरुणाने सामाजिक जाणीव ठेवून संविधान दिन ते गणतंत्र दिन म्हणजे 26 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 पर्यंत त्यांनी शिक्षण यात्रा नावाचा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या वाटा आणि विदेशात उच्च शिक्षणाच्या संधी याबाबत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधून मार्गदर्शन करण्याचा मोहीम सुरू केले. या मोहिमेतील एक टप्पा म्हणून लोकमान्य टिळक विद्यालयात मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
या अनुषंगाने ॲड. दिपक चटप यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती पाटील,उपप्राचार्य राजपुरोहित, पर्यवेक्षिका देगमवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पेंदाम यांनी तर आभार प्रदर्शन निहाल शेख या विद्यार्थ्यांने केले.
हिंदुस्थान समाचार
