अमरावती, 2 डिसेंबर (हिं.स.) : दर्यापूर शहराची ओळख ही कब्बडी खेळाची भूमी म्हणून आहे.याच लहानशा दर्यापूर शहरातून आजपर्यत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू कब्बडी व विविध खेळातून घडले आहे.याच क्रीडा क्षेत्रात आता पुन्हा एकदा दर्यापूर शहराला सन्मान प्राप्त झाला आहे.दर्यापूर शहरातील वैष्णवी स्पोर्टींग क्लब ची खिळाडू व प्रबोधन विद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्रावणी संतोष वाट हिची कब्बडी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहेबीड जिल्ह्यातील आष्टी येथे नुकत्याच राज्यस्तरीय 17 वर्षआतील शालेय कबड्डी स्पर्धा पार पडल्या.त्यामध्ये दर्यापूरची कु.श्रावणी संतोष वाट हिची चाचणीद्वारे राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली आहे.सांघिक खेळात राष्ट्रीय स्पर्धेत खेळणारी श्रावणी ही दर्यापूरची पहिलीच महिला खेळाडू ठरणार आहे.ती दर्यापूर येथे क्रीडा क्षेत्रात कार्यरत वैष्णवी स्पोटिग क्लबची खेळाडू असून मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश ठाकरे यांच्या मार्गर्शनाखाली व कबड्डी खेळाचे प्रशिक्षक तथा राष्ट्रीय कब्बडीपटू परिक्षीत चिकटे यांच्या मार्गदर्शाखाली ती नियमित सराव करत आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, प्रबोधन शाळेचे प्राचार्य,वैष्णवी स्पोर्टींग क्लब व प्रशिक्षक परीक्षित चिकटे यांना दिले आहे.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हिंदुस्थान समाचार
