जळगाव, 2 डिसेंबर (हिं.स.) – अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथून अज्ञात चोरट्यांनी 24 हजार रुपये किमतीचे तीन गुरे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सार बेटे येथील रहिवासी असलेले विशाल ब्रम्हे वय 48 हे शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या घरासमोर अंगणात 24 हजार रुपये किमतीचे गुरे बांधलेले असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याचा प्रकार उघडकीस आल्याने विशाल ब्रम्हे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.
हिंदुस्थान समाचार
