चेन्नई, 01 डिसेंबर (हिं.स.) : तामिळनाडूत अंमलबजावणी संचालनालायाच्या (ईडी) अधिकाऱ्याला आज, शुक्रवारी 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलीय. अंकित तिवारी असे या कथीत ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे. दिंडीगल येथेल एका डॉक्टर विरोधातील खटला बंद करण्यासाठी लाच घेताना तिवारीला अटक करण्यात आलीय.
यासंदर्भात तामिळनाडूच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अंकित तिवारी नावाच्या एका कथित ईडी अधिकाऱ्याला दिंडीगुलमध्ये एका डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. तिवारी ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसह अनेक लोकांना धमकावत होता आणि त्यांच्याविरुद्ध ईडीमध्ये सुरू असलेला खटला बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत होता असे त्यांनी सांगितले.तामिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अंकित तिवारीला पकडले आहे. आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अंकित तिवारी खरोखरच अंमलबजावणी संचालनालयाशी संबंधित आहे की नाही, याचा आम्ही शोध घेत आहोत. या आरोपासंदर्भात ईडीकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे स्पष्टिकरण आलेले नाही. पकडण्यात आलेली व्यक्ती स्वतःला इडीचा अधिकारी सांगत आहे. तो खरो खरच इडीचा अधिकारी आहे का? यासंदर्भात शोध घेतला जात आहे. ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अंकित तिवारीचे आयडी कार्डदेखील सादर केले आहे. हे आयडी कार्ड डिसेंबर 2024 पर्यंत वैध आहे.
हिंदुस्थान समाचार
