नवी दिल्ली, 01 डिसेंबर (हिं.स.) : ऑनलाईन पेमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे यूपीआय- आयडी जर वापरात नसतील तर असे आयडी निष्क्रीय होणार आहेत. आगामी 31 डिसेंबरपर्यंत असे आयडी निष्क्रीय करणार असल्याचे एनपीसीआयने सांगितले आहे.
पेमेंट रेग्युलेटरने (एनपीसीआय) एक परिपत्रक जारी करून थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर आणि पेमेंट सेवा प्रदात्यांना असे यूपीआय-आयडी निष्क्रिय करण्यास सांगितले आहे. ज्यांनी त्यांच्या आयडीसह वर्षभर कोणताही व्यवहार केला नाही. अशा निष्क्रिय ग्राहकांचा यूपीआय-आयडी 31 डिसेंबरपर्यंत निष्क्रिय केला जाईल. अशा आयडीवर आवक व्यवहार करणे शक्य होणार नाही. अशा यूपीआय- आयडीवर निधी येऊ शकणार नाही, परंतु देयके भरता येतील.
हिंदुस्थान समाचार
