नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात आयर्लंड, बोस्निया आणि हर्जेगोविना, आर्मेनिया, मलेशिया, माली आणि मार्शल बेटांचे राजदूत/उच्चायुक्त यांच्याकडून ओळखपत्रे स्वीकारली. ओळखपत्रे सादर करणाऱ्यांमध्ये 1. महामहिम केविन केली, आयर्लंडचे राजदूत, 2. महामहिम हॅरिस हर्ले, बोस्निया आणि हर्झेगोव्हिनाचे राजदूत, 3. महामहिम वहागन अफयान, आर्मेनियाचे राजदूत, 4. महामहिम मुझफ्फर शाह बिन मुस्तफा, मलेशियाचे उच्चायुक्त, 5. महमहिम ब्रिगेडियर जनरल फेलिक्स डायलो, मालीचे राजदूत आणि 6. महामहिंम अलेक्झांडर कार्टर बिंग, मार्शल बेटांचे राजदूत यांचा समावेश आहे.
हिंदुस्थान समाचार
