cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > दक्षिणेतील देशांमधील सहकार्य भविष्यातील व्यापाराचा पाया अधिक बळकट करेल – पीयूष गोयल
Business

दक्षिणेतील देशांमधील सहकार्य भविष्यातील व्यापाराचा पाया अधिक बळकट करेल – पीयूष गोयल

CliQ INDIA
Last updated: November 18, 2023 12:30 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : जागतिक पुरवठा साखळ्या अधिक मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह, स्थिर आणि न्याय्य होण्यासाठी, ग्लोबल साऊथ मधील देशांनी परस्पर सहकार्य आणि एकत्रित कृती करण्याची गरज आहे. त्याद्वारे ही साखळी व्यवस्था अधिक लवचिक बनवता येईल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत ते बोलत होते.

कोविड 19 महामारीचे संकट, हवामान बदलाचा प्रभाव आणि वाढते भू राजकीय तणाव, या सर्व घटकांमुळे जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या असून त्यांची स्थिती नाजूक झाली आहे. ह्या विस्कळीतपणामुळे, अन्न आणि आरोग्य सुरक्षेची मोठी आव्हाने निर्माण झाली असून, जीवनमानाचा खर्च वाढला आहे, तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्याच्या वेगावरही विपरीत परिणाम झाला आहे. जगासमोरील महत्वाच्या आव्हानांपैकी, बहुतांश आव्हाने, ग्लोबल साऊथने निर्माण केलेली नसली, तरीही, त्यांचा सर्वाधिक फटका मात्र, याच देशांना बसतो आहे, असे यथोचित निरीक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवले होते, असे गोयल यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा जग उपाययोजनांचा विचार करेल, तेव्हा तेव्हा, आपला सामूहिक आवाज ऐकला जायलाच हवा, यावरही पंतप्रधानांनी भर दिल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने सप्टेंबर महिन्यात, “ एक पृथ्वी, एक कुटुंब, आणि एक भविष्य” या संकल्पनेच्या आधारावर, ग्लोबल साऊथच्या पाठिंब्याने, जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते, हे गोयल यांनी नमूद केले. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत, भारताने ग्लोबल साऊथ चा आवाज बुलंद करण्यासाठी महत्वाचा हस्तक्षेप केला, आफ्रिकन युनियनला जी-20 चा स्थायी सदस्य बनवण्यासह, जी-20 च्या निष्कर्ष आराखड्यात ग्लोबल साऊथ साठी ठोस कृतिशील तरतुदी समाविष्ट करण्यापर्यंतच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. या प्रयत्नांमुळेच, आफ्रिकन महासंघ आता जी20 चा कायम सदस्य असेल, असेही ते म्हणाले ग्लोबल साऊथ चा आवाज अधिक बळकट करण्यासाठी आणि आपले भविष्य तसेच मानवतेसाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, ग्लोबल मूल्य साखळीच्या मॅपिंग साठी जी-20 आराखडा स्वीकारण्यात आला, ज्याद्वारे जी-20 अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक होईल.

ग्लोबल साऊथशी संबंधित पहिली गरज म्हणजे, ग्लोबल मूल्य साखळ्या लक्षात घेऊन, जिथे प्रत्येक देश केवळ त्यांचा सहभाग वाढविण्यावरच लक्ष केंद्रित करू शकत नाही, तर मूल्य साखळीत पुढे जाऊन त्यांच्या सहभागाची गुणवत्ता सुधारण्यावरही लक्ष केंद्रित करू शकतो, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे गोयल यांनी नमूद केले. यामुळे त्यांना जीव्हीसीएसच्या उच्च मूल्यवर्धित भागांमध्ये सर्वात मोठा वाटा घेण्यास मदत होईल, दुसरे म्हणजे, जीव्हीसीएसला नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही धक्के सहन करण्याची क्षमता मिळेल आणि तिसरे म्हणजे, आपल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा आंतरराष्ट्रीय बाजार आणि व्यापारात उत्तम समन्वय निर्माण होईल. आणि चौथे, तसेच शेवटचे म्हणजे, यामुळे, आपल्याला लॉजिस्टिक पायाभूत सुविधामधल्या त्रुटी बघता येतील. या त्रुटी भरून काढल्या तर ग्लोबल साऊथ चा जागतिक व्यापरातील सहभाग आणि एकात्म होणे वाढेल, असे ते म्हणाले. जर आपण या सगळ्यावर एकत्रित काम केले, तर, आपला व्यापार समग्र विकास आणि समृद्धी आणि विशेषतः शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य उद्दिष्टे साध्य करण्यावर परिणाम करू शकणाऱ्या परिवर्तनीय प्रभावांना आपण गती देऊ शकू, असे गोयल म्हणाले.

भारताच्या अध्यक्षतेखालील G 20 ने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या प्रणालींसाठी G 20 आराखडा आणला आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

एथर एनर्जीने देशभरात 500 एक्सपिरीयन्स सेंटर्सचा गाठला टप्पा
प्रायोरिटी ज्वेल्स लिमिटेडच्या प्री-आयपीओ फेरीत १५.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक
इंडिगोने चार दिवसांच्या उन्हाळी सुट्टी सेलची केली घोषणा; तिकिटांवर १० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट
प्रवास व होस्टिंगच्या क्षेत्रात महिलांची वाढती निर्णायक भूमिका; एअरबीएनबीने मांडले २०२५ चे ट्रेंड
ॲक्सिस म्युच्युअल फंडने लाँच केला ‘ॲक्सिस निफ्टी बँक इंडेक्स फंड’

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article 'मर्डरवाले कुलकर्णी' रंगमंचावर येण्यास सज्ज
Next Article न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्यांचा 22 नोव्हेंबरपासून दौरा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?