जनरलचा कंपार्टमेंटचा झाला भस्मसात
इटावा, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : नवी दिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसला आज, बुधवारी आग लागली. या घटनेत गाडीची जनरल बोगी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. उत्तरप्रदेशातील इटावा येथे सराई भूपत रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला. यावेळी गाडी ताशी 20 ते 30 किमी वेगाने धावत असल्यामुळे प्रवाशांनी चालत्या गाडीतून उडी मारून जीव वाचवला.
या अपघाताबाबत रेल्वेचे पीआरओ अमित सिंह यांनी सांगितले की, आगीमुळे कोणत्याही प्रवाशांना इजा झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इटावानजीकच्या सराई भूपत स्थानकाजवळ गाडी असताना संध्याकाळी 6 वाजेच्या सुमाराला गाडीच्या एस-1 कोचमध्ये आग लागली. त्याचे पुढील आणि मागील डबे एस-2, एस-3 आणि एसएलआर देखील खबरदारीचा उपाय म्हणून वेगळे करण्यात आलेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. धावत्या गाडीला संध्याकाळी 6.15 वाजेच्या सुमारास आग लागली. त्यानंतर काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त स्थानिक पोलीस दल दाखल झाले. ज्या बोगीत आग लागली होती. ती ट्रेनपासून वेगळी करण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. दरम्यान आगची नेमके कारण कळू शकलेले नाही.
हिंदुस्थान समाचार
