डेहराडून, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे आज, रविवारी निर्माणाधिन बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 कामगार अकडले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार, ब्रह्मकमळ आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगावदरम्यान 4 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जात आहे. या निर्माणाधिन बोगद्याचा 150 मीटरचा भाग कोसळला. या बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 40 कामगार अडकले आहेत. सध्या बोगद्याच्या आत ऑक्सिजन पाठवला जात आहे.अधिकाऱ्यांच्या सध्याच्या अंदाजानुसार कामगारांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. ढिगारा काढण्यासाठी ड्रिलिंग मशीनची व्यवस्था केली जात आहे.बोगदा कोसळल्याची माहिती मिळताच उत्तरकाशीचे एसपी अर्पण यदुवंशी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. हा सर्व हवामान बोगदा 4 धाम रोड प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. त्याच्या बांधकामानंतर, उत्तरकाशी ते यमुनोत्री धाममधील अंतर 26 किमीने कमी होईल.
हिंदुस्थान समाचार
