नाशिक, १० नोव्हेंबर (हिं.स.) : केवळ पाचशे रुपयांच्या लाच घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर खांडेकर, डेटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा शेलार, एजंट दत्तू देवरे यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
यांनी जनरल मुख्तारपत्र नोंदणी केलेला दस्त देण्यासाठी एजंट दत्तू देवरे यांनी लाच मागितली. तर शेलारने स्वीकारली. वरिष्ठ लिपिक खांडेकर यांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, हवालदार सचिन गोसावी, गणेश निबालकर,चवणके ,पवार यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन खाली ही कारवाई केली आहे.
हिंदुस्थान समाचार
