पुणे 4 नोव्हेंबर (हिं.स) : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह १४ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललित अनिल पाटील (वय ३७, रा. अक्षरधारा सोसायटी, मातोश्रीनगर, नाशिक), अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे (वय ३९, रा. ओशिवरा, मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी साह ऊर्फ सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहू रस्ता, जि. पुणे), रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ), भूषण अनिल पाटील (वय ३४, रा. मातोश्रीनगर, नाशिक), अभिषेक विलास बलकवडे (वय ३१, रा. विजय ॲनेक्स, नाशिक), रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी (वय २६, रा. धारावी, मूळ रा. अयोध्या), प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा अरुण माहिरे (वय ३९ रा. विंग स्पेसेस सोसायटी, नाशिक), झिशान इक्बाल शेख (वय ३३, रा. फ्रेंड्स कॉलनी, नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (वय ४०, रा. एकतानगर, नाशिक), राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार चौधरी (वय ३०, रा. विरार, मूळ रा. बिहार) यांना अटक करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
