पुणे 26 ऑक्टोबर (हिं.स) पुण्यात विविध चित्रपट महोत्सवांना तुम्ही हजेरी लावली असेल पण आता तंत्रज्ञान आणि कलेचा अनोखा मिलाफ असणाऱ्या एका खास तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट महोत्सवाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे. ”Vroooom” VR Film Festival नावानं हा फेस्टिव्हल होणार आहे. ग्योथं इन्स्टिट्यूट-मॅक्स म्युलर भवनतर्फे याचं आयोजन करण्यात आलं आहे.
येत्या शनिवार, २८ ऑक्टोबर ते शुक्रवार, ३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान पुण्यातील एरंडवणे येथील ”द बेस” या स्टुडिओमध्ये हा महोत्सव होणार आहे. सर्व दिवस सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत हे चित्रपट रसिकांना विनामूल्य पण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर पाहता येणार आहेत.मात्र, महोत्सवात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. यामध्ये व्हीआर या साधनाचा वापर करीत चित्रपट पाहण्याचा आनंद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.
हिंदुस्थान समाचार
