मुंबई, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – थिवि/नागपूर आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन चालवणार आहे.
१) लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर द्विसाप्ताहिक विशेष (२२ फेऱ्या) २२ एलएचबी कोच
01033 द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २६.१०.२०२३ ते ३०.११.२०२३ (११ फेऱ्या) पर्यंत दर मंगळवार आणि गुरुवारी २०.१५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १०.२५ वाजता पोहोचेल.
01034 साप्ताहिक विशेष सुपरफास्ट दि. २७.१०.२०२३ ते ०१.१२.२०२३ (११ फेऱ्या) पर्यंत दर बुधवार आणि शुक्रवारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर
संरचना : १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, पॅन्टरी कार आणि दोन जनरेटर व्हॅन.
आरक्षण : सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर विशेष गाड्या क्रमांक 01033 चे बुकिंग त्वरित सुरू होईल.
२)लोकमान्य टिळक टर्मिनस – थिवि त्रि-साप्ताहिक (२६ फेऱ्या) २१ ICF कोच
01129 ट्राय साप्ताहिक लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०१.११.२०२३ ते २९.११.२०२३ (१३ फेऱ्या) दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी २२.१५ वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल.
01130 त्रि-साप्ताहिक दि. ०२.११.२०२३ ते ३०.११.२०२३ (१३ ट्रिप) दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी १५.०० वाजता थिविम येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
संरचना : १ प्रथम वातानुकूलित, १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, १ द्वितीय बैठक श्रेणी आणि दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी
३)लोकमान्य टिळक टर्मिनस- दानापूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (१२ फेऱ्या) २४ ICF कोच
01409 साप्ताहिक स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २८.१०.२०२३ ते ०२.१२.२०२३ (६ फेऱ्या) दर शनिवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल.
01410 साप्ताहिक स्पेशल दि. २९.१०.२०२३ ते ०३.१२.२०२३ (६ फेऱ्या) दर रविवारी दानापूर येथून १८.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर
संरचना : २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह २४ सामान्य द्वितीय श्रेणी (ज्यात १० डबे आरक्षित स्थितीत चालवले जातील)
आरक्षण : विशेष गाडी क्रमांक 01409/01129 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २७.१०.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
हिंदुस्थान समाचार
