cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > टूल कीट टोळीच्या मायाजालात फसू नका- डॉ. मोहन भागवत
National

टूल कीट टोळीच्या मायाजालात फसू नका- डॉ. मोहन भागवत

CliQ INDIA
Last updated: October 24, 2023 2:00 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव साजरा

नागपूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : आपल्या देशातील आंतरिक असंतुष्टांना हाताशी धरून काही परदेशी शक्ती इथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतात हिंसा आणि असंतोष पसरावा याकरिता टूल किट सक्रिय केले जातात. तेव्हा असे फसवे मायाजाल आणि भ्रामक गोष्टींपासून सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशिमबाग मैदानावर आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे आणि महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सरंसंघचालक म्हणाले की, आपल्या समाजाचे विघटन होऊन विलगता आणि आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. हे लोक स्वतःला सांस्कृतिक मार्क्सवादी म्हणवत असले तरी 1920 च्या दशकातच ते मार्क्सला विसरले असून केवळ सत्ता प्राप्ती इतकेच त्यांचे उद्दिष्ट आहे. ते जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांना विरोध करतात. देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून दूर जात विचार करण्याची गरज असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

मणिपूरमधील हिंसेबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. भागवत म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून शांत असलेल्या मणिपूरमध्ये अचानक कलह का आणि कसा निर्माण झाला ? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का ? आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मैतेई आणि कुकी समाजाच्या संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला ? यात बाह्य शक्तींचा हात होता का ? असा सवाल सरसंघचालकांनी उपस्थित केला. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता ही काळाची गरज असतानाच, समाजातील प्रबोधनशील नेतृत्वालाही परस्परांमधील अविश्वासाची दरी भरून काढण्यासाठी विशेष भूमिका बजावावी लागेल असे सरसंघचालकांनी सांगितले. देशात एकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एकतेचेच तत्व दिले आहे. त्यांच्या आदर्शांवर देशाला चालावे लागेल. संविधान प्रदान करताना आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या दोन भाषणांकडे लक्ष दिले तर यातील मर्म आपल्या लक्षात येईल. सर्वांनी त्या भाषणांचा अभ्यास करण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले.

शासन, क्रीडापटू आणि वैज्ञानिकांचे कौतुक

यावेळी सरसंघचालकांनी भारत सरकार, देशाचे वैज्ञानिक आणि क्रीडापटू यांचे कौतुक केले. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख केला. भारताच्या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केल्याचे डॉ. भागवत यांनी नमूद केले. तसेच चांद्रयान मोहिमेच्या निमित्ताने भारताची शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकदेखील जगाने पाहिली. शास्त्रज्ञांच्या तंत्रज्ञान आणि तंत्रकुशलतेला नेतृत्वाच्या इच्छाशक्तीची जोड मिळाली. आपला देश सर्वच बाबतीत अग्रेसर होतो आहे. आर्थिक स्थितीतदेखील प्रगती दिसून येत आहे. स्टार्टअपची क्रांतीदेखील आपण पाहिल्याचे सरसंघचालकांनी नमूद केले.

मंदिरासोबत मनातही रामाची प्राणप्रतिष्ठा व्हावी

अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आगामी 22 जानेवारी रोजी श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्यवस्थेच्या मर्यादा आणि सुरक्षेची सावधानता लक्षात घेऊन अयोध्येत त्या शुभ प्रसंगी केवळ मर्यादित संख्येतंच उपस्थित राहता येणार आहे. अयोध्येतील राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

मतदान प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य

यावेळी सरसंघचालकांनी मतदानावरदेखील भाष्य केले. आगामी 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

पंतप्रधान मोदींनी स्वीडिश राजघराण्यातील प्रतिष्ठित सन्मान आणि धोरणात्मक प्रगतीसह इतिहास रचला
नागपूर : मृतकांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर
तामिळनाडू : ईडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
धाडसी निर्णयांनंतर आता पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या प्रलंबित अपेक्षा पूर्ण कराव्यात – राज ठाकरे | BulletsIn
महाकुंभात 5 कोटींहून अधिक भाविकांचे अमृतस्नान | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नवी मुंबई : 30 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन
Next Article वर्ध्यात मतदार जनजागृती अभियानांतर्गत नवमतदार नोंदणी शिबिर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?