नागपूर, 22 ऑक्टोबर – अभियंते आधुनिक जगाचे शिल्पकार असतात. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि समाजाला आधार देणार्याप प्रणालींना आकार देण्यासाठी ते जबाबदार असतात. ते समस्या सोडवणारे, नवनिर्मिती करणारे आणि निर्माते असतात. अभियंते हे परिवर्तनाचे आधारस्तंभ असतात, असे प्रतिपादन नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम ( एनईटीएफ), नॅशनल बोर्ड ऑफ- एक्रीडेशन (एनबीए) या संस्थाचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले. या दीक्षांत समारंभाला विद्यार्थी त्यांचे पालक आणि इतर भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूरच्या बुटोबोरीजवळ वारंगास्थित भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थान – ट्रिपल आयटीचा तिसरा दीक्षांत समारंभ वारंगा कॅम्पस येथे पार पडला. कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ट्रिपल आयटी नागपूरचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे, कुलसचिव कैलास डाखले यांची उपस्थिती होती.
पदवीधर विद्यार्थी हे घर, समाज, राष्ट्र, जग, मातृभूमी आणि या विश्वाच्या प्रगतीमागील प्रेरक शक्ती असतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान उपाय आणि उद्योजकीय कौशल्यांच्या सहाय्याने समाजातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता तुमच्या्मध्ये् असून देशाच्याा विकासात तुमचा हातभार लागेल, अशी आशा प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
दीक्षांत समारंभाची सुरुवात शैक्षणिक मिरवणुकीने दीक्षांत सभागृहात झाली.. संस्थेचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे यांनी स्वागतपर भाषण व संस्थेच्या अहवालाचे सादरीकरण केले.
या दीक्षांत समारंभात एकूण 324 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली गेली. त्याात 5 पीएचडीचे विद्यार्थी, 10 एमटेकचे विद्यार्थी,197 संगणक विज्ञान अभियांत्रिकी-सीएसई आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पुटर इंजिनिअरिंग–ईसीईचे विद्यार्थी, इंफार्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी-आयसीटीमध्ये 112 पदव्युत्तर पदविकेचे विद्यार्थी यांचा समावेश होता. ट्रिपल आयटीतर्फे सीएसई आणि ईसीई अभ्यासक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनांही यावेळी पुरस्कार प्रदान करण्या त आले. सीएसई अभ्यासक्रमाचे अमन वर्मा यांना तर ईसीई अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पवन कुमार यांना उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केल्याबद्दल मानपत्र आणि रोख राशी प्रदान करण्याात आले.
