सिंधुदुर्ग, 20 ऑक्टोबर : एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्या युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली तालुक्यामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून, १५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रियकरानेच आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कणकवली तालुक्यातील दोन आणि राजापूर तालुक्यातील एका युवकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या प्रियकराने तिला आधी जबरदस्तीने दारू पाजली. त्यांनतर स्वतः आणि त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना दारूम गावच्या माळरानावर १५ ते १६ ऑक्टोबरच्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. पीडित युवती ही कणकवली तालुक्यालगतच्या तालुक्यातील असून तळेरे येथे कामाला होती. याबाबत कणकवली तालुक्यातील दारूम , नादशिरवल आणि राजापूर तालुक्यातील केळवली गावातील युवकांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
