विराटच्या शतकी फलंजाजीने विजयावर शिक्कामोर्तब
पुणे, 19 ऑक्टोबर : पुण्यात झालेल्या विश्व चषकाच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताना बागलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. भारताच्या दमदार फलंदाजीत विराट कोहळीने मानाचा तुरा रोवला आहे. विराटने वैयक्तिक शतकासोबतच षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तसेच विश्व चषक सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळत एक हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंजाद ठरला आहे.
आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशच्या संघाने भारतापुढे 257 धावांचे आव्हान ठेवले होत. बांगलादेशचे सलामवीर तनझीद हसन ( 51) व लिटन दास (66) यांनी 93 धावांची भागीदारी केली. पण, कुलदीप यादवने पहिला धक्का दिल्यानंतर त्यांची गाडी घसरली. मुश्फिकर रहिम (38) आणि तोवहीद हृदय (16) यांनी 42 धावा जोडल्या. नसूम अहमद (14) व महमदुल्लाह 25 चेंडूंत 32 धावांची भागीदारी केली. महमदुल्लाहने 36 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह 46 धावा करून बांगलादेशला 8 बाद 256 धावांपर्यंत पोहोचवले. बांगलादेशच्या आव्हाना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघातर्फ रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी 88 धावा जोडल्या. रोहितने 40 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. तर शुबमनने 55 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. विराट व श्रेयस अय्यर यांनी त्यानंतर संयमाने खेळत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
विराटने 48 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराटने 52 वी धाव घेताच विश्व चषक सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर येऊन एक हजार धावा पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. श्रेयस अय्यरच्या (19) वाट्याला आणखी एक अपयशी खेळी आली. विराट व लोकेश राहुल यांनी भारताचा विजय पक्का केला. विराटने विजयासाठी 20 धावांची गरज असताना चांगली फटकेबाजी केली. शतकासाठी 9 आणि विजयासाठी 9 असे समीकरण आले असताना लोकेशने त्याला चांगली साथ दिली. विराटने 97 चेंडूंत एक दिवसीय क्रिकेटमधील 48 वे शतक पूर्ण केले. भारातने 41.4 षटकांत 3 बाद 261 धावा करून 7 गडी राखून विजय मिळवला.
