लासलगाव, 19 ऑक्टोबर : लासलगाव येथे श्री भक्तवत्सल बालाजी मंदिर येथे नवरात्रीनिमित्त श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती डॉ संगीता सुरसे यांनी दिली.
लासलगाव शहरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.त्या अनुषंगाने येथील श्री भक्तवत्सल बालाजी मंदिर येथे श्री दुर्गा सप्तशती पाठ चे पठण श्री स्वामी समर्थ केंद्र लासलगाव येथील सुनीता गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज दुपारी चार ते सहा या वेळेत सुरू आहे.या सप्तशती पाठासाठी महिलांची मोठ्या प्रमाणांत उपस्थिती होत आहे.
या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये माँ दुर्गेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते.नवरात्रीत व्रत करणारी व्यक्ती उपासनेसोबतच दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करते.असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
