अहमदनगर, 18 ऑक्टोबर, : नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे.आनंद नगर परिसरातील रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असून,कामे करताना त्याचा दर्जा देखील चांगला राखला जात असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.
आगरकर मळा येथील आनंदनगर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमीपूजन प्रसंगी नगरसेवक शिंदे बोलत होते.
नगरसेवक शिंदे म्हणाले की,प्रभागात विकास कामांसह प्रलंबीत प्रश्न सोडविण्यात येत आहे.आगरकर मळा भागात फेज टू चे काम पूर्ण झालेले आहे.या योजनेला महापालिकेचा निधी असल्याने ठेकेदार काम करण्यास तयार होत नाही. उन्हाळ्यात या भागात पाणी प्रश्न गंभीर बनतो. फेज टू ची लाईन येथील नागरिकांना स्वखर्चाने जोडून दिली जाणार असून,त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.उपस्थित महिलांनी नगरसेवक शिंदे यांचे प्रलंबीत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आभार मानले.
