प्रतिक्विंटल भाव 3 हजार रुपयांवर पोहचला
लासलगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत आज, सोमवारी दिवस अखेर 3000 रुपये प्रतिक्विंटर दर मिळाला. कांद्याच्या दरात एकाच दिवसात 500 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या दोन दिवसात किरकोळ बाजारत कांद्याची दरवाढ होण्याती शक्यता आहे.
केंद्र सरकारने पंधरा दिवसांपूर्वी कांद्याला 40 टक्के निर्यात शुल्क लावले होते. त्यावरून शेतकरी आणि कांदा व्यापारी या दोघांनीही एकाच वेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन पुकारले होते त्यानंतर काही काळ कांद्याचे लिलाव सुरू झाले परंतु पंधरा दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांनी लिलावास सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी 14 दिवस आपला संप चालू ठेवला 14 दिवसानंतर केंद्र सरकारने काहीतरी तोडगा काढण्याची आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. व्यापाऱ्यांचा झालेला संप आणि कांदा चाळीमध्ये साठवला असताना झालेला पाऊस यामुळे चाळीतील कांदा हा बऱ्यापैकी सडला होता त्यामुळे साठा कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम या दरवाढीवर होत असल्याचे या जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु, आता पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न भेटण्याच्या मार्गावरती आहे शनिवार पर्यंत पंचवीस रुपये सरासरी कांद्याला भाव मिळाला होता मागील सोमवारपासूनच कांद्याच्या भावामध्ये शंभर दोनशे रुपयांनी कधीच चढ कधी उतार होत होता परंतु आज सोमवारी एका दिवसामध्ये ज्यावेळी सायंकाळी लिलाव संपले त्यावेळी कांद्याचा सरासरी भाव हा पाचशे रुपयांनी वाढला असून ज्यावेळी लिलाव बंद झाले त्यावेळी कांद्याला सरासरी तीन हजार रुपये भाव मिळाला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काही सणासुदीच्या दिवसात खुल्या बाजारामध्ये कांद्याचे भाव हे वाढणार असल्याचे मत बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलेय.
हिंदुस्थान समाचार
