अहमदनगर, 14 ऑक्टोबर : मेजर लिग बेसबाॅल (एमएलबी),इंडिया आणि संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या भव्य मैदानावर नुकत्याच विभागीय एमएलबी कप रिजनल स्पर्धा घेण्यात आल्या.यात संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स अंतर्गत संजीवनी इंटरनॅशनल स्कूल,शिर्डी व संजीवनी अकॅडमी,कोपरगांव यांच्या संयुक्तिक संघाने ११ वर्ष आतिल वयोगटात उत्तर व दक्षिण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला.हा संघ पंजाब मधील प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे २ नोव्हेंबरपासून होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तर व दक्षिण महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे,अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स च्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी दिली.
एमएलबी हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ असुन जगभरात या खेळाचा प्रचार आणि प्रसार अमेरिकेमार्फत केला जात आहे.या खेळाचे भारतातील कार्यालय दिल्ली येथे असुन याच कार्यालयाच्या पुढाकाराने कोपरगांव येथे उत्तर व दक्षिण महाराष्ट्र विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पुणे,सातारा,कोल्हापुर,सोलापुर,अहमदनगर,नाशिक,जळगांव,छत्रपती संभाजीनगर, अकोला,धुळे,नंदुरबार,बीड,जालना इत्यादी जिल्ह्यातील एकुण ३२ संघांनी सहभाग नोंदविला.संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संघाने कर्णधार श्रीजय निखिल बोरावके याच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट ट खेळाचे प्रदर्शन करीत उत्तर व दक्षिण महाराष्ट्रात अव्वल असल्याचे सिध्द केले.संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या शाळांमध्ये विध्यार्थ्यांना समजेल अशा पध्दतीने शिक्षण देण्यासाठी कृतीयुक्त अध्ययन पध्दतीचा अवलंब करून प्रथम प्राधान्य दिले जाते.याच बरोबरोबर बहुआयामी विध्यार्थी घडवुन भविष्यात ते कोणतेही आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हावे,या हेतुने त्यांच्यात शैक्षणिक अभ्यासाबरोबरच इतरही पैलुंची पेरणी करण्यासाठी संस्थेने देश पातळीवर निपुणता पात्र प्रशिक्षक नेमलेले असल्यामुळे खेळ,सांस्कृतिक, संगीत,कला,सायन्स अँड टेक्नॉलॉजी इत्यादी बाबींमध्ये ते आघाडीवर असतात.याचाच परीणाम म्हणुन संजीवनी स्कूल्सचे विध्यार्थी अनेक स्पर्धांमध्ये यश खेचुन आणतात.पालकांचेही त्यांचे पाल्य घडविण्यासाठी मोठे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स च्या संचालिका डाॅ.मनाली कोल्हे यांनी दिली.
