नाशिक, ०७ ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिक महानगर भाजप मंडल अध्यक्ष घोषित करण्यात आले असल्याचे भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे. नवीन मंडल अध्यक्षांच्या रचनेत अर्धा डझन हून अधिक मंडल अध्यक्षांना पुन्हा संधी दिलेली आहे.
मंडल अध्यक्ष – पंचवटी – ज्ञानेश्वर काकड, तपोवन – चंद्रशेखर पंचाक्षरी, नाशिक रोड -शांताराम (जयप्रकाश) घंटे, मध्य – वसंत उशीर, जुने नाशिक – भास्कर घोडेकर, द्वारका – सुनील देसाई, सातपूर – भगवान काकड, सिडको -1 – रविंद्र पाटील, सिडको -2 – अविनाश पाटील तसेच नाशिक महानगरातील कार्यकारिणीत उपाध्यक्ष व चिटणीस पदावर खालील नावे घेण्यात आली आहे…उपाध्यक्ष – प्रकाश चकोर, प्रशांत कोतकर, डॉ.विनय मोगल, अनिल मटाले, राजेश आढाव, राहुल पवार, धनंजय पुजारी, चिटणीस – ऍड.परमानंद पाटील, शरद फडोळ, महेंद्र पाटील, यशवंत पवार, बबन ढगे, संतोष भोर, मंगेश पगार, अमोल गांगुर्डे
या मंडल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे नावे निश्चित करतांना मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा.प्रदेशाध्यक्ष आ.चंदशेखर बावनकुळे, ना.गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, आ.राहुल ढिकले, आ.देवायानी फरांदे, आ.सीमा हिरे, प्रदेश मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण,प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदिप पेशकार, बाळासाहेब सानप, विजय साने, सतिष नाना कुलकर्णी आदी वरिष्ठ नेत्यांची चर्चा व विचार विनिमय करून निश्चित करण्यात आली आहे. असे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल भाजपचे विद्यमानशहर पदाधिकारी तसेच नाशिक महानगराचे आजी-माजी पदाधिकारी आघाड्या व प्रकोष्ट यांचे पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी आदींनी मंडल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
हिंदुस्थान समाचार
